Saturday, 19 January 2013

दूरदर्शनवर ‘भारत की शान ३’
भारतात दूरदर्शन एवढा प्रेक्षकवर्ग कोणत्याही वाहिनीला प्राप्त करता येणार नाही. मात्र दूरदर्शनवरुन प्रसारित होणा-या कार्यक्रमांच्या एकंदरीतचं दर्जामुळे या वाहिनीला कायम दुय्यम अशी वागणूक मिळत आली आहे. आता मात्र मुकेश शर्मा यांच्या नेतृत्वाखाली दूरदर्शनने कात टाकण्याचा प्रयत्न सुरू केला असून त्याचाच एक भाग म्हणून ‘भारत की शान भाग ३’ या कार्यक्रमाचे तिसरे सत्र येत्या १५ जानेवारीपासून दूरदर्शनवर सुरू होत आहे. सारेगमप या गाजलेल्या कार्यक्रमांनी सर्वाना ज्ञात असलेल्या गजेंद्र सिंग यांच्या साईबाबा इंटरटेंनमेटंने या मालिकेची निर्मिती केली असून या मालिकेच्या माध्यमातून भारतातल्या गायकांचा शोध घेतला जाणार आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी असलेली ही भारतातली एकमेव स्पर्धा आहे.

वेगळया वाटेवरचा‘लव इज वाट’

मराठी चित्रपटात आतापर्यंत अनेक प्रेमकथा आल्या आहेत. आताच्या काळातल्या एक वेगळी प्रेमकथा व्हॅलेंटाईन डे च्या मुहुर्तावर प्रदर्शित होत आहे. लव इज वाट असे या चित्रपटाचे नाव असून या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहन सातघरे यांनी केले आहे.
मराठी चित्रपटात आतापर्यंत अनेक प्रेमकथा आल्या आहेत. आताच्या काळातल्या एक वेगळी प्रेमकथा व्हॅलेंटाईन डे च्या मुहुर्तावर प्रदर्शित होत आहे. लव इज वाट असे या चित्रपटाचे नाव असून या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहन सातघरे यांनी केले आहे. या चित्रपटाची कथा व पटकथाही त्यांचीचं आहे. या चित्रपटात क्रांती रेडकर व अमित भानुशाली यांच्या महत्वपूर्ण अशा भूमिका असून त्यांच्या सोबत डॉ. प्रविण सुर्यवंशी, विजय चव्हाण, उल्हास उजवणे व योगिता साबळे यांच्याही महत्वपूर्ण अशा भूमिका आहेत. आतापर्यंत अनेक चित्रपटांचे व मालिकांचे दिग्दर्शन केलेल्या रोहन सातघरे यांचा हा चित्रपट कसा होतो ते आता पाहायचे आहे.

साहसी मोगली, धाडसी डुक्कर आणि जादूचं मांजर

मित्रांनो, नाटक पाहायला तर सगळ्यांनाच आवडतं. विशेषत: नाटकाची कथा मजेशीर आणि आपल्या आवडत्या विषयावर म्हणजेच गोष्टींवर आधारित असेल तर?
मित्रांनो, नाटक पाहायला तर सगळ्यांनाच आवडतं. विशेषत: नाटकाची कथा मजेशीर आणि आपल्या आवडत्या विषयावर म्हणजेच गोष्टींवर आधारित असेल तर? अशी नाटकं पाहण्याची आणि त्यात काम करण्याची संधी नुकतीच आपल्या काही मित्रांना मिळाली. ही संधी त्यांना उपलब्ध करून दिली होती युरो स्कूलने. युरो किड्स संस्थेमार्फत आणि युरो स्कूलअतंर्गत मुलुंड येथे आपल्या छोटया दोस्तांसाठी ‘फुटलाइट्स चिल्ड्रन थिएटर फेस्टिवल’ नुकतेच आयोजित करण्यात आलं होतं.
मुलांसाठी थिएटर आणि कलेचा विकास व्हावा आणि अभिनयक्षेत्राचा त्यांना अनुभव मिळावा या हेतूने हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. तीन अत्यंत लोकप्रिय नाटकं या महोत्सवात सादर करण्यात आली. गेल्या पाच वर्षापासून मुलांच्या थिएटरसाठी काम करण्याऱ्या ‘थिएटर प्रोफेशनल’ या संस्थेने ‘जंगल बुक’, ‘सुअर चला स्पेस को’, ‘कॅट हाऊस’ ही तीन नाटकं मुलांसाठी बसविली होती.
या नाटकांतून अनेक छोटय़ा कलाकारांनी आपला अभिनय सादर केला. बॉलिवुड अभिनेता कुणाल कपूर याच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं.मजेशीर कथा असणा-या या तीन नाटकांचा बालप्रेक्षकांनी आणि त्यांच्या पालकांनी मनमुराद आनंद लुटला. स्टेजवर मोगली, बगीरा, बल्लू, शेरखान, धाडसी डुकर, आणि जादूचं मांजर बघताना मुलांनी खूप धम्माल केली.
या तीन नाटकांतील बालकलाकारांचे कुणाल कपूर याने खूप कौतुक केले. संगीत, नृत्य, अभिनय यामुळे मुलांच्या बौद्धिक स्तरात वाढ होते, त्यामुळे असे उपक्रम मुलांसाठी खूप प्रेरणादाई ठरतात, असे मत यावेळी कुणाल याने व्यक्त केले.

अमेरिकेचे तपास पथक जपानमध्ये दाखल

ऑल निपॉन एअरवेजच्या ‘बोइंग ७८७’मधील बॅटरीला आग लागल्यानंतर याचा अधिक तपास करण्यासाठी अमेरिकन सुरक्षा एजन्सीचे तपास पथक शुक्रवारी जपानमध्ये दाखल झाले.
टोकियो- ऑल निपॉन एअरवेजच्या ‘बोइंग ७८७’मधील बॅटरीला आग लागल्यानंतर याचा अधिक तपास करण्यासाठी अमेरिकन सुरक्षा एजन्सीचे तपास पथक शुक्रवारी जपानमध्ये दाखल झाले. या पथकामध्ये अमेरिकन सुरक्षा एजन्सीचा एक आणि वाहतूक नियंत्रकाचा एक आणि बोइंग कंपनीच्या दोन अधिका-यांचा समावेश आहे. बॅटरीला आग लागलेल्या विमानाला पश्चिम जपानमधील टाकामात्सू विमानतळावर ठेवण्यात आले असून तपास अधिकारी या विमानतळावर दाखल झाले आहे.
दरम्यान, अमेरिकन हवाई वाहतूक नियंत्रक आणि डीजीसीएकडून ड्रीमलायनरसंदर्भातील सुरक्षा अहवाल येत्या एक ते दोन दिवसांत प्राप्त होईल, अशी अपेक्षा एअर इंडियाने व्यक्त केली आहे. अमेरिकन हवाई वाहतूक नियंत्रकाच्या आदेशानंतर जगातील सर्वच विमान कंपन्यांनी आपल्या ताफ्यातील ड्रीमलायनर विमानांची उड्डाणे थांबवली होती. यामध्ये एअर इंडियाच्या सहा विमानांचा समावेश आहे. बोइंगकडून ड्रीमलायनरसंदर्भात काही तरी आर्थिक मदत दिली जाईल, असे मत हवाई वाहतूकमंत्री अजित सिंह यांनी व्यक्त केली आहे.
मुंबईत नर्सरीत शिकणा-या मुलीवर धावत्या बसमध्ये बलात्कार  झाला नसून वाहकाने छेडछाड केल्‍याचे पोलिस आयुक्त सत्‍यपाल सिंह यांनी सांगितले.
मुंबई- मुंबईत नर्सरी स्कूलमध्ये शिकणा-या चार वर्षांच्या मुलीवर धावत्‍या स्‍कूलबसमध्‍ये बलात्‍कार झाल्‍याच्‍या घटनेने खळबळ उडाली होती. परंतु, तिच्‍यावर बलात्‍कार झाला नसून वाहकाने छेडछाड केल्‍याचे शनिवारी पोलिस आयुक्त सत्‍यपाल सिंह यांनी स्‍पष्‍ट केले.
जुहू येथील जमनाबाई नरसी स्कूलमध्ये शिकणा-या एका चार वर्षीय शाळकरी मुलीचा मंगळवार १५ जानेवारी रोजी स्कूलबसमध्ये क्लीनरने विनयभंग केला होता असे सिंग यांनी सांगितले. मात्र या प्रकरणात आरोपीवर गुन्ह्याचे कलम लावताना पोलिसांकडून हलगर्जीपणा झाल्याची कबुली डॉ. सिंग यांनी दिली. त्यात दुरुस्ती करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पोलिसांनी यापूर्वी जुहू येथे एका बडया नर्सरी स्कूलमध्ये शिकणा-या चार वर्षांच्या मुलीवर धावत्या बसमध्ये बलात्कार झाल्याचा गुन्हा दाखल करुन याप्रकरणी बसचा वाहक रमेश राजपूतला अटक केल्याची माहिती दिली होती.
पोलिसांनी यापूर्वी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी स्कूल बसमधुन मुलांना घरी सोडल्यानंतर वाहक रमेश राजपूतने पिडित मुलीवर बलात्कार केला. पिडित मुलगी सर्वात शेवटी उतरणार होती. पोलिसांनी गुरुवारी संध्याकाळी रमेश राजपूतला अटक केली. त्याच्यावर बलात्कार, छेडछाड आणि अन्य गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
रमेश राजपूतला शुक्रवारी अंधेरी सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला एक फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात बस चालकाला साक्षीदार बनविण्यात आले असून, बसमध्ये पाठिमागे काय चालू होते ते आपल्याला कळले नाही असे बसचालकाने सांगितले.
मंगळवारी दुपारी स्कूलबस शाळेमधुन निघाली तेव्हा बसमध्ये बारा मुले होती. प्रत्येक विद्यार्थिनीला तिच्या घराजवळ उतरविण्यात येत होते. पिडित मुलगी पुढच्या आसनावर बसली होती. सर्व मुले उतरल्यानंतर रमेश राजपूतने पिडित मुलीला मागे जाऊन बसण्याची धमकी दिली व बसमध्ये मागच्या सीटवर तिच्यावर बलात्कार केला. या मुलीचे घर जवळ आल्यानंतर रमेशने तिला कोणाला काही सांगितले, तर वाईट परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली.
राजपूतच्या धमकीने भेदरलेल्या मुलीने मंगळवारी आपल्या पालकांना काही सांगितले नाही. मात्र बुधवारी तिने आपल्या आई-वडिलांना घडला प्रकार सांगितला. त्यानंतर वडिलांनी शाळेच्या मुख्याध्यापकांकडे तक्रार केली. शाळेने मुलीची वैद्यकीय तपासणी करुन लगेचच पोलिसात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी बसचा चालक, वाहक आणि बसमधील महिला प्रतिनिधीला ताब्यात घेतले आहे. राज्य सरकारच्या नियमानुसार मुलांची स्कूलबसने ने-आण करताना बसमध्ये महिला प्रतिनिधीची असली पाहिजे. शाळेने गुन्हा घडताना बसमध्ये महिला प्रतिनिधी होती व तिने वाहकाला रोखले असा दावा केला आहे तर, गुन्हा घडताना बसमध्ये महिला प्रतिनिधी नव्हती असे पोलिसांचे म्हणणे आहे.

Saturday, 1 December 2012

महाराष्ट्र के  जलगाँव में 9 राज्य औ के लिए   सैन्य भरती की शुरवात