साहसी मोगली, धाडसी डुक्कर आणि जादूचं मांजर
मित्रांनो, नाटक पाहायला तर
सगळ्यांनाच आवडतं. विशेषत: नाटकाची कथा मजेशीर आणि आपल्या आवडत्या विषयावर
म्हणजेच गोष्टींवर आधारित असेल तर?
मुलांसाठी थिएटर आणि कलेचा विकास व्हावा
आणि अभिनयक्षेत्राचा त्यांना अनुभव मिळावा या हेतूने हा महोत्सव आयोजित
करण्यात आला होता. तीन अत्यंत लोकप्रिय नाटकं या महोत्सवात सादर करण्यात
आली. गेल्या पाच वर्षापासून मुलांच्या थिएटरसाठी काम करण्याऱ्या ‘थिएटर
प्रोफेशनल’ या संस्थेने ‘जंगल बुक’, ‘सुअर चला स्पेस को’, ‘कॅट हाऊस’ ही
तीन नाटकं मुलांसाठी बसविली होती.
या नाटकांतून अनेक छोटय़ा कलाकारांनी आपला
अभिनय सादर केला. बॉलिवुड अभिनेता कुणाल कपूर याच्या हस्ते या महोत्सवाचं
उद्घाटन करण्यात आलं.मजेशीर कथा असणा-या या तीन नाटकांचा बालप्रेक्षकांनी
आणि त्यांच्या पालकांनी मनमुराद आनंद लुटला. स्टेजवर मोगली, बगीरा, बल्लू,
शेरखान, धाडसी डुकर, आणि जादूचं मांजर बघताना मुलांनी खूप धम्माल केली.
No comments:
Post a Comment