दूरदर्शनवर ‘भारत की शान ३’
भारतात दूरदर्शन एवढा प्रेक्षकवर्ग
कोणत्याही वाहिनीला प्राप्त करता येणार नाही. मात्र दूरदर्शनवरुन प्रसारित
होणा-या कार्यक्रमांच्या एकंदरीतचं दर्जामुळे या वाहिनीला कायम दुय्यम अशी
वागणूक मिळत आली आहे. आता मात्र मुकेश शर्मा यांच्या नेतृत्वाखाली
दूरदर्शनने कात टाकण्याचा प्रयत्न सुरू केला असून त्याचाच एक भाग म्हणून
‘भारत की शान भाग ३’ या कार्यक्रमाचे तिसरे सत्र येत्या १५ जानेवारीपासून
दूरदर्शनवर सुरू होत आहे. सारेगमप या गाजलेल्या कार्यक्रमांनी सर्वाना
ज्ञात असलेल्या गजेंद्र सिंग यांच्या साईबाबा इंटरटेंनमेटंने या मालिकेची
निर्मिती केली असून या मालिकेच्या माध्यमातून भारतातल्या गायकांचा शोध
घेतला जाणार आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी असलेली ही भारतातली
एकमेव स्पर्धा आहे.
No comments:
Post a Comment