Saturday, 19 January 2013

मुंबईत नर्सरीत शिकणा-या मुलीवर धावत्या बसमध्ये बलात्कार  झाला नसून वाहकाने छेडछाड केल्‍याचे पोलिस आयुक्त सत्‍यपाल सिंह यांनी सांगितले.
मुंबई- मुंबईत नर्सरी स्कूलमध्ये शिकणा-या चार वर्षांच्या मुलीवर धावत्‍या स्‍कूलबसमध्‍ये बलात्‍कार झाल्‍याच्‍या घटनेने खळबळ उडाली होती. परंतु, तिच्‍यावर बलात्‍कार झाला नसून वाहकाने छेडछाड केल्‍याचे शनिवारी पोलिस आयुक्त सत्‍यपाल सिंह यांनी स्‍पष्‍ट केले.
जुहू येथील जमनाबाई नरसी स्कूलमध्ये शिकणा-या एका चार वर्षीय शाळकरी मुलीचा मंगळवार १५ जानेवारी रोजी स्कूलबसमध्ये क्लीनरने विनयभंग केला होता असे सिंग यांनी सांगितले. मात्र या प्रकरणात आरोपीवर गुन्ह्याचे कलम लावताना पोलिसांकडून हलगर्जीपणा झाल्याची कबुली डॉ. सिंग यांनी दिली. त्यात दुरुस्ती करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पोलिसांनी यापूर्वी जुहू येथे एका बडया नर्सरी स्कूलमध्ये शिकणा-या चार वर्षांच्या मुलीवर धावत्या बसमध्ये बलात्कार झाल्याचा गुन्हा दाखल करुन याप्रकरणी बसचा वाहक रमेश राजपूतला अटक केल्याची माहिती दिली होती.
पोलिसांनी यापूर्वी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी स्कूल बसमधुन मुलांना घरी सोडल्यानंतर वाहक रमेश राजपूतने पिडित मुलीवर बलात्कार केला. पिडित मुलगी सर्वात शेवटी उतरणार होती. पोलिसांनी गुरुवारी संध्याकाळी रमेश राजपूतला अटक केली. त्याच्यावर बलात्कार, छेडछाड आणि अन्य गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
रमेश राजपूतला शुक्रवारी अंधेरी सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला एक फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात बस चालकाला साक्षीदार बनविण्यात आले असून, बसमध्ये पाठिमागे काय चालू होते ते आपल्याला कळले नाही असे बसचालकाने सांगितले.
मंगळवारी दुपारी स्कूलबस शाळेमधुन निघाली तेव्हा बसमध्ये बारा मुले होती. प्रत्येक विद्यार्थिनीला तिच्या घराजवळ उतरविण्यात येत होते. पिडित मुलगी पुढच्या आसनावर बसली होती. सर्व मुले उतरल्यानंतर रमेश राजपूतने पिडित मुलीला मागे जाऊन बसण्याची धमकी दिली व बसमध्ये मागच्या सीटवर तिच्यावर बलात्कार केला. या मुलीचे घर जवळ आल्यानंतर रमेशने तिला कोणाला काही सांगितले, तर वाईट परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली.
राजपूतच्या धमकीने भेदरलेल्या मुलीने मंगळवारी आपल्या पालकांना काही सांगितले नाही. मात्र बुधवारी तिने आपल्या आई-वडिलांना घडला प्रकार सांगितला. त्यानंतर वडिलांनी शाळेच्या मुख्याध्यापकांकडे तक्रार केली. शाळेने मुलीची वैद्यकीय तपासणी करुन लगेचच पोलिसात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी बसचा चालक, वाहक आणि बसमधील महिला प्रतिनिधीला ताब्यात घेतले आहे. राज्य सरकारच्या नियमानुसार मुलांची स्कूलबसने ने-आण करताना बसमध्ये महिला प्रतिनिधीची असली पाहिजे. शाळेने गुन्हा घडताना बसमध्ये महिला प्रतिनिधी होती व तिने वाहकाला रोखले असा दावा केला आहे तर, गुन्हा घडताना बसमध्ये महिला प्रतिनिधी नव्हती असे पोलिसांचे म्हणणे आहे.

No comments:

Post a Comment