अमेरिकेचे तपास पथक जपानमध्ये दाखल
ऑल निपॉन एअरवेजच्या ‘बोइंग
७८७’मधील बॅटरीला आग लागल्यानंतर याचा अधिक तपास करण्यासाठी अमेरिकन
सुरक्षा एजन्सीचे तपास पथक शुक्रवारी जपानमध्ये दाखल झाले.
दरम्यान,
अमेरिकन हवाई वाहतूक नियंत्रक आणि डीजीसीएकडून ड्रीमलायनरसंदर्भातील
सुरक्षा अहवाल येत्या एक ते दोन दिवसांत प्राप्त होईल, अशी अपेक्षा एअर
इंडियाने व्यक्त केली आहे. अमेरिकन हवाई वाहतूक नियंत्रकाच्या आदेशानंतर
जगातील सर्वच विमान कंपन्यांनी आपल्या ताफ्यातील ड्रीमलायनर विमानांची
उड्डाणे थांबवली होती. यामध्ये एअर इंडियाच्या सहा विमानांचा समावेश आहे.
बोइंगकडून ड्रीमलायनरसंदर्भात काही तरी आर्थिक मदत दिली जाईल, असे मत हवाई
वाहतूकमंत्री अजित सिंह यांनी व्यक्त केली आहे.
No comments:
Post a Comment